काकड आरतीने झाली ‘भक्तीमय पहाट’

29 Oct 2025 16:25:20
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
Kakad Aarti : तालुक्यातील सायखेड येथे पहाटेच्या वेळी मंदिरातून येणाèया काकड आरतीच्या सुमधुर स्वरांनी सर्वत्र एक सकारात्मक आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले. कोजागरी पौर्णिमेपासून सुरू होणाèया काकड आरतीची परंपरा आजही दारव्हा शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये उत्साहात सुरू आहे. त्याचप्रमाणे सायखेड येथे पहाटेच्या शांत वातावरणात भक्तांनी मंदिरात जमून काकडआरती केली आणि दिवसाची सुरुवात भगवंताच्या नामस्मरणाने केली.
 
 
 
y29Oct-Aarati
 
 
 
सकाळच्या वेळी काकड आरतीमुळे केवळ मंदिराचेच नव्हे, तर संपूर्ण गाव परिसराचे वातावरण मंगलमय झाले. काकड आरतीच्या वेळी भजन, गौळण आणि मंत्रांचे उच्चारण केले जाते. यामुळे भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. अनेक ठिकाणी काकड आरती केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित राहत नाही, तर सामाजिक एकोप्याचेही प्रतीक बनते. गावकèयांनी एकत्र येऊन सामूहिकपणे काकड आरती करणे, हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरतो. यामुळे समाजामध्ये बंधुता आणि एकोपा टिकून राहण्यास मदत होते.
 
 
काकड आरतीमुळे केवळ भक्तीचे प्रदर्शन होत नाही, तर त्यातून मिळणाèया सकारात्मक ऊर्जेने सर्वांनाच नवचैतन्य मिळते. भक्तांनी एकत्र येऊन केलेल्या या प्रार्थनेमुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो. काकड आरतीचा गजर ऐकून आणि या मंगलमय वातावरणाचा अनुभव घेऊन, दिवसाची सुरुवात खूपच आल्हाददायक होते.
दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीची वाट बघत असतो. पहाटेच्या वेळी मंदिरातून येणारे हे भजन आणि कीर्तन ऐकून मन शांत होते. यामुळे दिवसभर काम करण्याची एक सकारात्मक ऊर्जा मिळते. ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर आपल्या समाजाला एकत्र आणणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
- सोमनाथ जाधव, सायखेड
सायखेडचे भाविक
सुरुवातीला मला पहाटे उठून मंदिरात जाणे कंटाळवाणे वाटायचे. पण एकदा मित्रांसोबत गेलो आणि तो अनुभव खूप चांगला होता. काकड आरतीमुळे मिळणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा खूपच प्रभावी आहे. ही परंपरा खूप सुंदर आहे आणि ती टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
- सागर वाघमारे, सायखेड
गावातील नागरिक
Powered By Sangraha 9.0