उमरखेड-महागाव तालुक्यांसाठी रोहित्र व उपकेंद्र मंजूर

29 Oct 2025 20:09:47
वीजपुरवठा अधिक सक्षम होणार

उमरखेड, 
यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशांनुसार उमरखेड शहर व तालुका आणि महागाव तालुक्यातील वीजपुरवठा सशक्त करण्यासाठी New Transformer नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कमी दाब, भारनियमन आणि वीजपुरवठ्यातील अडचणी दूर या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 

Transformer
 
या मंजुरीसाठी आमदार किसन वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आणि महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांनी विशेष पुढाकार घेतला. मंजूर निधीमुळे शहरासोबतच ग्रामीण भागातील आवश्यक ठिकाणी New Transformer नवीन रोहित्र बसविण्यात येणार असून शेतकरी, व्यवसायी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा लाभ होणार. भाजपा नेते नितीन भुतडा यांच्या पाठपुराव्याला यश मिळत उमरखेड औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र उपकेंद्राला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अनेक वर्षांपासूनची ही मागणी पूर्ण झाल्याने स्थानिक उद्योगांना दर्जेदार वीजपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 
 
उमरखेड शहरातील वाढत्या लोडमुळे रोहित्र वारंवार जळण्याच्या घटना घडत होत्या. ही समस्या दूर करण्यासाठी शहरात २७ ठिकाणी नवीन बसविण्यास मान्यता मिळाली आहे. आंबेडकर पुतळा, रहीमनगर, चरडेनगर, साईश्रद्धानगर, नाग चौक, बाळू पाटील नगर, बुद्धविहार यांसह विविध प्रभागांमध्ये हे New Transformer  रोहित्र बसवले जाणार आहेत. यामुळे शहरातील सुमारे ७५ टक्केवीज समस्या निकाली निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. उपकार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांच्या म्हणण्यानुसार, नवीन रोहित्र व उपकेंद्रांमुळे उमरखेड आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून येत्या काळात वीज समस्यांमध्ये मोठी घट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0