नागपूर,
Podar Prep School जगन्नाथ नगर येथील पोदार प्रेप,शाळेत दिवाळी मेळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकाश, आनंद आणि एकत्र येण्याचा हा सण पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाने उजळला.
कागदी माळा, रंगीत रांगोळ्या, ओरिगामी दिवे तयार करणे तसेच सणासुदीच्या फोटो बूथमध्ये पोझ देणे अशा विविध उपक्रमांतून
लहानग्यांनी सर्जनशीलतेचा आणि आनंदाचा उत्सव अनुभवला. Podar Prep School दिवाळीचा खरा प्रकाश वाटल्याने तो अनेक पटींनी वाढतो या कार्यक्रमाची संकल्पना स्वाती पोपट वस्त यांची असून, सेंटर हेड रश्मी कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला
सौजन्य:सोनाली गलघाटे,संपर्क मित्र