वनोजादेवी येथे प्रशांत भंडारी यांचे उपोषण सुरू
मारेगाव,
वनोजा व वनोजादेवी परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांच्या पूर्तता करण्यात यावी, याकरिता वनोजा येथील उपसरपंच तसेच शिवसेनेचे मारेगाव उपतालुकाप्रमुख Prashant Bhandari प्रशांत भंडारी यांनी बुधवार, २९ ऑक्टोबरपासून वनोजादेवी चौपाटीवर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्य महामार्ग क‘मांक ३१७ व इतर गावांना जोडणारे रस्ते खड्डेमय असल्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, महापूराअणि अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनी, ओलिताखालील जमिनी व विहिरीत गाळ पंचनामे करावे आणि वनोजा गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
तसेच राज्यमार्ग क्रमांक ३१७ च्या निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तर चौकशी करून दुरुस्ती करण्यात यावी, वनोजादेवी चौपाटी येथे पोलिस चौकी देण्यात यावी, महावितरणचे ३३ केव्ही पॉवर उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, राज्यमार्गावरील जड वाहतूक बंद याही मागण्यांसाठी हे आम्दोलन आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येणार्या सर्व खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, आरोग्य विभागातील कर्मचारी बदल्यांमुळे रुग्णांना होणारा त्रास थांबवावा, अशा विविध मागण्याकरिता उपसरपंच Prashant Bhandari प्रशांत भंडारी यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पहिल्या दिवशी या उपोषणस्थळाला शिवसेना नेते चोरडिया, विनोद मोहितकर, विशाल किन्हेकर आणि शिवसेना पदाधिकार्यांनी भेटी दिल्या.