'तुम्ही आम्हाला मारून टाकू शकता, हरवू शकत नाही'

29 Oct 2025 16:27:27
मुंबई,
reel star movie मराठी चित्रपटविश्वात पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. बहुचर्चित चित्रपट ‘रील स्टार’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, यामुळे आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाकूर आणि आदर्श शिंदे यांसह हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी या ट्रेलरला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले.
 

reel star movie 
ट्रेलरमध्ये एका reel star movie सामान्य माणसाच्या संघर्षाची कथा सादर करण्यात आली आहे. सायकलवरून सामान विकणारा भानुदास आणि त्याच्या कुटुंबाच्या स्वप्नांची कहाणी प्रेक्षकांना ‘रील स्टार’मध्ये पाहायला मिळणार आहे. भानुदास जरी रोजच्या उपजीविकेसाठी सायकल चालवतो, तरी त्याच्यात रील बनवण्याची कमालीची कला आहे. त्याच्या आणि पत्नीच्या स्वप्नांची सांगड हे चित्रपटाचे केंद्रस्थानी आहे.चित्रपटात सत्ता, संघर्ष, जाती-पातीचे राजकारण आणि पैशांच्या शक्तीचा पॉवरगेमही प्रभावीरीत्या मांडला आहे. ट्रेलरमधील संवाद, “पोलीसांच्या कर्तव्यनिष्ठेची जागा मनी आणि मसल पॉवर असलेले गब्बर घेतात, तेव्हा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही,” हा प्रत्यक्ष घटकांना थक्क करणारा आहे. याचसोबत, “तुम्ही आम्हाला मारून टाकू शकता, हरवू शकत नाही,” असे संवाद प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालतात. तसेच, ‘गर गर गरा, जिंदगी घुमे चाकावरती…’ हे गाणं कथानकाचा मूळ भाग उलगडते.दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी सांगितले की, “‘रील स्टार’ची कथा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी निगडीत आहे. सामान्य माणसाच्या स्वप्नांची सांगड, संघर्ष आणि समाजव्यवस्थेतील राजकारण यात मिसळून प्रेक्षकांसमोर एक मनोरंजक चित्रपट आणला आहे.” त्यांनी असेही नमूद केले की, सुमधूर गीत-संगीत आणि दमदार अभिनय या चित्रपटाच्या प्रमुख आकर्षणांपैकी आहेत.
 
 
चित्रपटाची निर्मिती reel star movie जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली असून, ‘अन्य’ या मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ‘रील स्टार’चे दिग्दर्शन केले आहे. नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक सुधीर कुलकुर्णी यांनी लेखन केले आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी असून, ‘दृश्यम’ फेम संगीतकार विनू थॉमस यांनी चार गाण्यांचे संगीत सजवलं आहे, तर एक गाणं शुभम भट यांनी संगीतबद्ध केले आहे.चित्रपटात प्रसाद ओक हाडाच्या पत्रकाराच्या दमदार भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या जोडीला मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जे जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर आणि महेश सुभेदारसारखे दिग्गज कलाकार आहेत. तसेच, बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना भाववून टाकतील.
Powered By Sangraha 9.0