‘सरदार १५० युनिटी मार्च’ शुक्रवारी

29 Oct 2025 20:37:29
यवतमाळ, 
भारत सरकारचे मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, यवतमाळ जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार 'Sardar 150 Unity March' सरदार वल्लभभाई पटेल १५० व्या जयंतीनिमित्त शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता ‘सरदार १५० युनिटी मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे.
 

Sardar patel 
 
'Sardar 150 Unity March' ही पदयात्रा अमोलकचंद महाविद्यालय येथून सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. या पदयात्रेत पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अन्य अधिकारी सहभागी होणार आहेत. ५०० युवक या सहभागी होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन होणार आहे. ही पदयात्रा अमोलकचंद महाविद्यालय ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जाजू चौक, दत्त चौक, माईंदे चौक, अ‍ॅग्लो हिंदी हायस्कूल आणि परत अमोलकचंद महाविद्यालय या अशी भ्रमण करणार आहे. यवतमाळकरांनी या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0