सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत : अँड सुधीर कोठारी

29 Oct 2025 20:21:02
हिंगणघाट
Sudhir Kothari केंद्र शासनाने हंगाम २०२५-२६ करिता सोयाबीनची आधारभूत किंमत रु. ५३२८/- प्रति क्विंटल निश्चित केलेली आहे. सन २०२५-२६ या हंगामातील सोयाबीनची कापणी व मळणी साधारणतः ०५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झाली आहे. सोयाबीन या शेतमालावर ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सोयाबीनला असलेल्या शेंगातील फक्त ३०% दाणे पूर्ण भरणा झाल्यामुळे शेतमालाच्या प्रतीमध्ये मोठी तफावत आहे व त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला असून साधारणतः एकरी दीड ते दोन क्विंटल पावेतो उत्पादन मिळत आहे.
 
 

Sudhir Kothari 
याचा शेतकऱ्यांना Sudhir Kothari मोठा फटका बसत आहे. तसेच मजुरांच्या टंचाईमुळे सगळीकडे सोयाबीन पिकाची मशीनद्वारे हार्वेस्टिंग करून शेतकरी आपले सोयाबीन काढत आहे. हार्वेस्टरमुळे शेतातील असलेल्या सोयाबीन सोबतच काडी कचरा सुद्धा हार्वेस्टरद्वारे कापल्या जात असल्यामुळे तसेच शेतातील ओलाव्यामुळे सोयाबीनच्या फांद्या बहरल्या आहे व त्यामुळे सोयाबीनसह काडी कचरा सुद्धा सोयाबीनमध्ये येत आहे. तसेच सोयाबीन मळणीच्या वेळेस मागील व याआठवड्यात झालेल्या अकाली पावसामुळे सोयाबीनची प्रत खराब झाली आहे. त्यामुळे समिती आवारात आवक होत असलेल्या सोयाबीनमध्ये मातीरा, काडीकचरा, कुजलेल्या, बुरशी लागलेल्या सोयाबीनचा समावेश असल्यामुळे सोयाबीनला खुल्या बाजारात आधारभूत दरापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीन या शेतमालाला मिळत असलेले दर लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधारभूत दराने शासनास सोयाबीन विक्रीच्या दृष्टीने शासनाने तात्काळ खरेदी केंद्र सुरु करणे गरजेचे झाले आहे अशी मागणी बाजार समितीचे सभापती एड सुधीर कोठारी यांनी एका निवेदनातून केली आहे.
 
 
त्यामुळे बाजार Sudhir Kothari समितीच्या कायद्यामध्ये असलेली तरतूद लक्षात घेता, बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी आज दि. २९/१०/२०२५ ला जिल्हाधिकारी, वर्धा, मा. सरव्यवस्थापक (नाफेड खरेदी), दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, मुंबई, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा व जिल्हा मार्केटिंग अधिकारी, वर्धा यांना सोयाबीन या शेतमालाची आधारभूत दराने खरेदी सुरु करण्याच्या दृष्टीने खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत विंनती केल्याचे तसेच त्याबाबतच्या पत्राची प्रत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने सादर केल्याची माहिती निवेदनातून दिली. यावेळेस बाजार समितीचे उपसभापती हरिष वडतकर, संचालक मंडळ मधुकरराव डंभारे, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालिया, प्रफुल बाडे, उत्तमराव भोयर, राजेश मंगेकर, डॉ. निर्मेश कोठारी, घनश्याम येरलेकर, अशोक उपासे, पंकज कोचर, संजय कातरे, शुभ्रबुध्द कांबळे, हर्षद महाजन, ज्ञानेश्वर लोणारे, माधुरी माधवराव चंदनखेडे, नंदा दिगांबर चांभारे व सचिव टी.सी. चांभारे यांनी या मागणीचे समर्थन केले आहे.
Powered By Sangraha 9.0