दिल्ली उच्च न्यायालयाचा ‘द ताज स्टोरी’ साठी नकार

29 Oct 2025 15:53:38
नवी दिल्ली,
the taj story controversy अभिनेता परेश रावल यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘द ताज स्टोरी’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. ही याचिका वकील शकील अब्बास यांनी दाखल केली असून, चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी तत्काळ संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.
 

the taj story controversy 
याचिकाकर्त्यांचा the taj story controversy आरोप आहे की या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करण्यात आला असून, त्यामुळे देशातील सांप्रदायिक सौहार्द धोक्यात येऊ शकते. याचिकेत म्हटले आहे की हा चित्रपट मनगढंत कथानकावर आधारित आहे आणि तो समाजात धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. ‘द ताज स्टोरी’३१ ऑक्टोबर रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे.अब्बास यांनी दाखल केलेल्या याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की चित्रपटाच्या टीझर आणि प्रचार पोस्टरमध्ये ताजमहालाचा घुमट वर उचलला जातो आणि त्याखाली भगवान शिवाची आकृती दिसते. या दृश्यामुळे ताजमहालाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक अर्थावर सार्वजनिक चर्चेला आणि वादाला सुरुवात झाली आहे.या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन तुषार अमरीश गोयल यांनी केले असून, निर्माते सुरेश झा आहेत. या चित्रपटात परेश रावल यांच्यासोबत जाकिर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात ताजमहालाच्या निर्मितीभोवतीचे वादग्रस्त प्रश्न मांडले गेले असून, स्मारकासंदर्भातील पारंपरिक ऐतिहासिक दृष्टीकोनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
 
 
न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिल्याने आता या प्रकरणाचा पुढील टप्पा काय होतो, याकडे चित्रपटसृष्टीसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0