व्यंकटेश नगरात रंगला स्नेहमिलन सोहळा

29 Oct 2025 13:02:52
नागपूर,
Venkatesh Nagar व्यंकटेश गृह निर्माण सहकारी संस्था मर्यादित, व्यंकटेश नगर, खामला रोड यांच्या वतीने "वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निरंजन बोबडे यांच्या "गंध मराठी मातीचा" या मराठी गीतांच्या कार्यक्रमात पोवाडा, लावणी, गोंधळ, भक्तिसंगीत, भावगीत, जोगवा व सुगमसंगीत अशा विविध प्रकारांची सुरेख मेजवानी सादर झाली.
 

nk 
 
बालकलाकारांनी सादर केलेले “जय महाराष्ट्र माझा” हे गीत विशेष आकर्षण ठरले. Venkatesh Nagar अखेरीस “माउली माउली” गाण्यावर सर्व श्रोते तल्लीन झाले.कार्यक्रमाचे निवेदन धनश्री शेवलकर यांनी केले. सचिन डोंगरे व त्यांच्या चमूचे मोलाचे सहकार्य लाभले.आभार प्रदर्शनअनघा फडके, सचिव व्यंकटेश मंदिर समिती यांनी केले. परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सौजन्य:विजय दाणी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0