पांढरकवडा,
शहरात वाढत चाललेल्या कचर्याच्या ढिगार्यांविरोधात आणि पांढरकवडा नगर परिषदेच्या निष्क्रियतेविरोधात गांधी जयंतीच्या दिवशी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. युवा टायगर फोर्सच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात आणून ठेवत ‘Kacara bheta andolana’ ‘कचरा भेट आंदोलन’ केले.
आंदोलनाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदन करून करण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजीने नप परिसर दणाणून गेला. नप प्रशासन व कंत्राटदार स्वच्छतेबाबत बेजबाबदार असून शहरात सर्वत्र कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत अनेकदा निवेदन देऊनसुद्धा नगर परिषद प्रशासन या गंभीर मुद्याकडे लक्ष देत नव्हते. मुख्याधिकार्यांनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ‘Kacara bheta andolana’ कचरा स्वतः गाडीत टाका, असे विधान केल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला होता.
‘Kacara bheta andolana’ आंदोलन सुरळीत पार पडावे म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माजी नप अध्यक्ष संतोष बोरेले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्याशी संपर्क साधताच आंदोलनास देण्यात आली. या आंदोलनात युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन जिड्डेवार, संतोष बोरेले, टायगर फोर्सचे मुख्य संयोजक अंकित नैताम, अॅड. अनिल किनाके, अमर पाटील यांच्यासह टायगर फोर्सचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक या आगळ्यावेगळ्या आंदोलनात सहभागी झाले होते.