जयताळा येथे आरोग्य व रक्तदान शिबिर

03 Oct 2025 14:19:19
नागपूर,
Asha Hospital Kamthi नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, जयताळा व आशा हॉस्पिटल, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने जयताळा रोड, बाजार चौक येथे निःशुल्क आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात बी.पी., शुगर, नेत्र तपासणी व ई.सी.जी. या सेवांचा लाभ नागरिकांना मिळाला. यासोबतच रक्तदान शिबिराचे विशेष आकर्षण होते. सुमारे २०० पेक्षा अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
 

shibir 
 
या वेळी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य-आमदार संदीप जोशी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच सतीश शिंदे, विजय कौशलAsha Hospital Kamthi  यांचे मार्गदर्शन आणि श्रीराम पुरोहित, संजय गुप्ता, महेश अलोनी आदींचे विशेष सहकार्य शिबिराला लाभले.
सौजन्य:डॉ. प्रभुदास रामटेके,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0