आपट्याच्या पानावर तंबाखूविरोधी संदेशाव्दारे जनजागृती

03 Oct 2025 17:50:50
वाशीम,
awareness anti tobacco विजयादशमीच्या निमित्ताने स्थानिक बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विभागाच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम हाती घेतला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर तंबाखूविरोधी संदेश लिहून लोकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
 
 

awareness 
 
 
यानंतर शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीतून विविध चौकांवर व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घ्यावी तसेच तंबाखूचे दुष्परिणाम सांगत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. माझे कुटुंब, माझा परिसर, माझे गाव, माझा महाराष्ट्र तंबाखूमुक्त करीन अशी प्रतिज्ञा यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. या उपक्रमात तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी पोस्टर स्पर्धेत भाग घेतला. यात प्रथम क्रमांक विघ्नेश वानखेडे, द्वितीय रजत कुटे, तृतीय अनुजा काकडे, तर प्रोत्साहनपर क्रमांक अथर्व चांगटे आणि अनुज घोडके यांनी पटकावला. यानंतर शहरात झालेल्या ‘चला धावूया नशामुक्त वाशीमसाठी’ या भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार श्याम खोडे, नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश गायकवाड आणि पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.awareness anti tobacco यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका भोंडे व शिक्षकवर्गाने कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0