गर्भाशयाशिवाय मुलांचा जन्म शक्य!

03 Oct 2025 09:37:48
नवी दिल्ली,
birth to children without a uterus वैद्यकीय क्षेत्रातील नव्या संशोधनाने विज्ञानाच्या प्रगतीला एक नवे वळण दिले आहे. जगभरातील अनेक दांपत्यांना वंध्यत्वाच्या समस्येमुळे मूल होणे शक्य होत नाही. काहींना आयव्हीएफचा आधार घेऊनही पालकत्व मिळत नाही. पण आता वैज्ञानिकांच्या नव्या प्रयोगामुळे आईच्या गर्भाशयाशिवाय मुलांचा जन्म होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी प्रथमच मानवी त्वचेच्या पेशींमधून अंडी तयार करण्यात यश मिळवले आहे. या शोधामुळे ज्यांना गर्भधारणा शक्य नाही, अशा महिलांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की, ही पद्धत प्रत्यक्ष वापरण्यापूर्वी अजून किमान एक दशक संशोधन आणि प्रयोगांची आवश्यकता आहे.
 
 

birth to children without a uterus 
ही प्रक्रिया कशी होते याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, मानवी पेशीतील केंद्रक घेतले जाते. त्यात व्यक्तीचा अनुवांशिक कोड असतो. हा कोड त्वचेच्या पेशीतून घेऊन दात्याच्या अंड्यात रोपण केला जातो आणि त्या अंड्यातील मूळ कोड काढून टाकला जातो. अशा रीतीने नव्या प्रकारे अंडी तयार होतात. birth to children without a uterus या प्रक्रियेला यश मिळाले, तर मुलांचा जन्म आईच्या गर्भाशयाशिवाय होऊ शकतो. तथापि, या संशोधनासोबत नैतिक आणि कायदेशीर प्रश्नही गुंतलेले आहेत. समाजमान्यतेशिवाय या पद्धतीला व्यवहारात आणणे कठीण ठरणार आहे. हा महत्त्वपूर्ण अभ्यास नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून, यामागे अमेरिकेतील ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीचे संचालक शौख्रत मितालिपोव्ह यांच्या नेतृत्वाखालील टीम कार्यरत होती.
 
 
 
Powered By Sangraha 9.0