दूषित पाण्यामुळे किडनीग्रस्त दोघांचा मृत्यू

03 Oct 2025 21:45:17
गावातील पाणीपुरवठा योजना कुचकामी : प्रशासनाचे दुर्लक्ष
महागाव, 
ग्रामपंचायततर्फे सुरू असलेल्या Contaminated water supply दूषित पाणीपुरवठ्यामुळे वागद (इजारा) गावात किडनी आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यापैकी दोन रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप गावकर्‍यांकडून होत
 
 
suresh
 
महागाव तालुक्यातील वागद (ईजारा) येथे गावकर्‍यांना दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केजा जात असून याबाबत गावकर्‍यांनी पाणी तपासण्याची मागणी केल्यानंतर प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये गावातील Contaminated water supply  पाणी पिण्यायोग्य नसून त्यामध्ये टीडीएस १२०० च्यावर असून यावर उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून प्लांट बसवून घेतला. परंतु त्यावरील फिल्टर हटविल्याने हा प्लांट शोभेची वस्तू बनला आहे. गावात होणार्‍या दूषित पाणी पुरवठ्यामुळे किडनीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
 
 
या रुग्णांपैकी सुरेश तुकाराम राठोड (वय ५०) आणि सुरेखा अर्जुन चव्हाण (वय ४५) हे सात वर्षांपासून आजाराशी लढा देत होते. परंतु या दोघांचीही प्राणज्योत मालवली. यांचे पती अर्जुन चव्हाण यांनी पत्नीच्या जिवासाठी तब्बल ६१५ वेळा डायलिसिस केले. या उपचारांसाठी त्यांनी आपली तीन एकर शेती विकून औषधोपचार केले. पण शेवटी त्यांना अपयश आले. पुसद विधानसभा मतदारसंघातील सेवादासनगर, वडद परिसरात आतापर्यंत ४५ हून अधिक नागरिक किडनीच्या आजाराने मृत्युमुखी पडले. तरीही या गंभीर प्रकाराकडे आरोग्य प्रशासनाचे अक्षम्य आहे.
 
 
Contaminated water supply  शेतकरी नेते मनीष जाधव यांनी या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त करत सांगितले की, ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा योजनेवर झालेल्या खर्चाचे ऑडिट करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात किडनीग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. या गंभीर व ज्वलंत प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करणे आवश्यक एकट्या वागद गावातीलच नव्हे तर जिल्हाभरातील अनेक गावांमधील नागरिकांच्या जीवनाशी सुरू असलेला खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने गंभीर होणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0