सहकार पॅटर्न म्हणून बुलडाणा अर्बनचा देशात नावलौकिक: राधेश्याम चांडक

03 Oct 2025 21:37:34
बुलडाणा, 
radheshyam-chandak : सहकारात ईश्वरीय शक्ती आहे. बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून सहकाराला जी ओळख आहे, त्या माध्यमातून बुलडाणा अर्बन पॅटर्न राबवून ते सहकार पॅटर्न जगापुढे येईल अशी खात्री मला आहे असे मत बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी संस्थेच्या ३९ व्या आमसभेसमोर व्यक्त केले.
 
 
K
 
सहकार विद्या मंदिरच्या भव्य सांस्कृतिक सभागृहात दि २८ सप्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा अर्बन संस्थेची ३९ वी आमसभा संपन्न झाली. या आमसभेचे उदघाटक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल सुकेश झंवर, उपाध्यक्ष विनोद केडिया, संचालक डॉ किशोर केला, अंबेश बियाणी,गोपाल चिरानिया, दिनेश गांधी, अजय सेंगर, मंजुबाई गाडगे,आदींच्या हस्ते भारतमातेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
 
 
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर यांनी संस्थेच्या माध्यमातून भविष्यातील आव्हाने आणि पॉलिसी यावर सविस्तर माहिती दिली. पहिल्या भागात संस्थेला मिळालेले पुरस्कार,दुसर्‍या भागात संस्थेचे आर्थिक स्थिती व सामाजिक सवंरक्षणा, तर तिसर्‍या भागात भविष्यातील आव्हाने व नवनवीन निर्णय यावर सविस्तर माहिती देवून ते पुढे म्हणाले की बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा अर्बन संस्था आज यशस्वी वाटचाल करीत आहे. संस्थेला आज ३९ वर्षे होत आहे. १२ हजार रुपये पासुन सुरु झालेली ही संस्था आज वटवृक्षात झाली आहे. हे राधेश्याम चांडक यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली झाले. संयम, सचोटी आणि वेळ या त्रिसूत्री मुळे शय झाले. असे बोलून त्यांनी संस्थेची संपूर्ण लेखाजोखा मांडला.
 
 
 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी संस्थेच्या ३९ वर्षाच्या अखंडपणे सुरू असलेल्या आर्थिक, सामाजिक, व शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. बुलडाणा अर्बन संस्थेच्या वेअर हाऊस, कोल्ड स्टोअरेज, या योजनेला महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यातील शेतकरी, व्यापारी,सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगून चांडक पुढे म्हणाले की संस्थेचे चिखली, मलकापूर भुसावळ, वर्धा, येथील कोल्ड स्टोअरेजला व्यापारीनीं भरघोस प्रतिसाद दिला.
 
 
या आमसभेत प्रामाणिकपणा जपणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अध्यक्ष डॉ सुकेश झंवर यांच्या हस्ते करण्यात आले.तर या सभेचे विषयसुचीचे वाचन रविंद्र कुळकर्णी यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ किशोर केला यांनी केले.
 
 
लोणार येथे लवकरच रिसॉर्ट उभारणार
 
 
बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी चार नवीन योजना ची सविस्तर माहितीत सांगितले की लोणार सारखेच दुसरे सरोवर फिलीपाईन्स येथे तकलुवन या बेटावर आहे. त्या सरोवराला जगभरातील सर्व पर्यटक मोठ्या संख्येने येतात, बुलडाणा अर्बन संस्थेच्या माध्यमातून पर्यटकांच्या दृष्टीने लोणार येथे अतिशय सुंदर रिसॉर्ट उभारणार आहे. सोबतच सिंदखेडराजा येथे सुध्दा हॉटेलची व्यवस्था लवकरच करणार आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0