वाजवत अंगविक्षेप व असभ्य वर्तणूक डीजे मालकासह ७ जणांवर गुन्हे दाखल

03 Oct 2025 22:58:24
उमरखेड, 
उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी काढलेल्या DJ Prakaran -Crime filed डीजे बंदी आदेशाचा भंग करून तालुक्यातील विडूळ येथे धम्मचक्र प्रवर्तनदिन मिरवणुकीत डीजे वाजवत, अंगविक्षेप करत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी डीजे ७ आणि इतर १५ ते २० जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. २५ सप्टेंबरपासून यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केला होता. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी उमरखेड उपविभागीय दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तालुक्यात डीजे बंदी लागू करण्यात आली होती. या संदर्भात विडूळच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीला वैयक्तिक नोटीसही देण्यात आली होती.
 
 
vidul
 
DJ Prakaran -Crime filed  तरीही २ ऑक्टोबर रोजी विडूळ येथे झालेल्या मिरवणुकीदरम्यान समितीचे पदाधिकारी रवींद्र हापसे वय (३०), नरेंद्र धुळे (२९), किरण नरवाडे (२७), तुषार भगत (२६), पवन वाढवे (२८), दत्तशिव मुन्नेश्वर (३०) आणि डीजेमालक राहुल गायकवाड (२६, पुणे) यांसह इतर १५ ते २० यांनी आदेशाचे उल्लंघन केले. डीजे क्र. एमएच११ एएल४५१४ लावून मिरवणुकीत डीजेवर चढून अश्लील इशारे व अंगविक्षेप करून जाहीरपणे असभ्य वर्तन केले आहे. याची नोंद पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर डीजे वाहन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. या कृत्यामुळे जमावबंदी आदेश व डीजे बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तनाचा गुन्हा नोंदवण्यात ही कायदेशीर तक्रार पोलिस जमादार नीतेश लांडे यांनी दिली असून सातजणांसह डीजे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
विडूळकरांचा पोलिस ठाण्याला घेराव
गुरुवारी विडूळ येथे वाजवण्यात आलेल्या DJ Prakaran -Crime filed  डीजेप्रकरणी जमा करण्यात आलेला डीजे, समितीचे पदाधिकारी व इतर लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना तत्काळ देण्यात यावे आणि समितीच्या पदाधिकारी व इतर लोकांवर गुन्हे दाखल करू नये, यासाठी विडूळच्या शेकडो महिला व पुरुषांनी उमरखेड पोलिस ठाण्यात घेराव घालत ठिय्या दिला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार शंकर पांचाळ यांनी त्यांची समजूत काढून परत जाण्याचा सल्ला दिला. यावेळी पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Powered By Sangraha 9.0