सरकारचा खर्या अर्थाने प्रगतिशील निर्णय
नागपूर,
महाराष्ट्र सरकारने आस्थापना २४ बाय ७ सुरू ठेवण्यास दिलेली परवानगी हा एक ऐतिहासिक निर्णय असून यामुळे आर्थिक उलाढाल वाढणार असल्याची प्रतिक्रिया चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष Dr. Dipen Agarwal डॉ. दिपेन अग्रवाल यांनी व्यक्त केली.
Dr. Dipen Agarwal राज्य सरकारने खर्या अर्थाने प्रगतिशील निर्णय घेतला असून यामुळे किरकोळ, आतिथ्य, मनोरंजन व सेवा क्षेत्रासह उद्योगांना लाभ होणार आहे. वाढीव कामकाजाच्या वेळेमुळे व्यापारांना सुध्दा लाभ होणार होईल. विशेषतः सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील, कारण आस्थापनांना अतिरिक्त पाळ्या व्यवस्थापित करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे. नागरिकांना वस्तू व सेवा दिवस-रात्र कोणत्याही वेळी उपलब्ध होण्याची सोय मिळेल. या निर्णयामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी विकास, संधी स्पर्धेचा नवा युगारंभ होईल.