यवतमाळ पोलिसांकडून ५३७ किलो अंमली पदार्थ नष्ट

03 Oct 2025 23:09:27
यवतमाळ, 
विशेष मोहिमेंतर्गत यवतमाळ पोलिस दलातर्फे १४ गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेले ५३७.७७९ किलो Drug destruction अंमली नष्ट करण्यात आले. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स विशेष पोलिस महानिरीक्षकांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत १४ गुन्ह्यांतील जप्त गांजा नष्ट करण्याबाबत न्यायालयानेही आदेश दिले होते.
 
 
Ganja
 
त्या अनुषंगाने सर्व कायदेशिर प्रक्रिया पार पाडून महाराष्ट्र नियंत्रण मंडळ यांच्या परवानगीने १ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बुटीबोरी येथे Drug destruction अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या आदेशाने ५३७.७७९ किलो गांजाचे भस्मीकरण करण्यात आले. ही कारवाई अमली पदार्थ विल्हेवाट समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सदस्य अपर अधीक्षक अशोक थोरात व उपअधीक्षक सुनील हूड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, सहपोलिस निरीक्षक मनीष गावंडे व अंमली पदार्थ विरोधी कक्षातील अंमलदार यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0