वंदे भारतच्या धडकेने चार ठार

03 Oct 2025 10:36:47
पूर्णिया,
Four killed in Vande Bharat collision बिहारमधील पूर्णिया येथे शुक्रवार (३ ऑक्टोबर २०२५) सकाळी वंदे भारत एक्सप्रेसने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघात कटिहार-जोगबनी रेल्वे मार्गावरील जबनपूर शहराजवळ घडला. मृतांच्या वयाची माहिती १८ ते २०-२१ वर्षांच्या दरम्यान असून, ते दसरा मेळाव्यातून परत जात असताना हा अपघात झाला.
 
 
Four killed in Vande Bharat collision 
प्राथमिक माहितीनुसार, पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. उरलेल्यांपैकी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून सध्या उपचार सुरू आहेत. पूर्णियातील रेल्वे व्यवस्थापक मुन्ना कुमार यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली असून, अपघाताची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. या भीषण अपघातामुळे परिसरात चिंता आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.
Powered By Sangraha 9.0