वडनेर,
gadchiroli news वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या दारोडा येथे देवी विसर्जनासाठी वना नदीत गेलेल्या चार पैकी दारोडा येथील हर्षल चाफले (२२), विशाल पोहाणे (२५) या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल गुरुवार २ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, वाहून जाणार्यांना वाचवण्यासाठी ठाणेदारांनी नदीच्या पाण्यात उडी मारली.
मिळालेल्या माहितीनुसार, दारोडा येथे गुरुवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरातील दुर्गा देवीचे विसर्जन करण्यासाठी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येने तरुण यामध्ये सहभागी झाला होते. विसर्जन करण्यासाठी नेमलेल्या स्थळी विसर्जन न करता गावातीलच दोन किलोमीटर वना नदीत विसर्जन करण्याचे मंडळांने ठरविले. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वाजत गाजत देवी विसर्जनाची गावातून काढण्यात आली आणि थेट पांदन रस्त्याने वणा नदीच्या घाटावर सहभागी मंडळ विसर्जनासाठी पोहोचले. विसर्जनात सहभागी झालेले चार युवक नदीच्या प्रवाहात उतरले. पाण्याच्या खोल प्रवाहात गेल्याने एकमेकांना आवाज देऊ लागले. परंतु, चौघांपैकी दोघेजण कसेबसे परत आले. मात्र, त्यापैकी हर्षल आणि विशाल हे नदीच्या प्रवाहात बुडाल्याने धारेच्या ओघात वाहून गेले. काल रात्री उशिरापर्यंत पोलिस आणि गावकर्यांच्या मदतीने तरुणांचा शोध घेण्यात आला. परंतु, शोध लागला नाही. आज दिवस उजाडताच शोध कार्य सुरू केले.gadchiroli news वडनेर पोलिसांनी रेस्यू पथकाच्या मदतीने सकाळी नऊ वाजता विशाल पोहाने याचा मृतदेह घटनास्थळावरून एक किलोमीटर अंतरावर शोधून काढला. दुसरा मृतदेह दुपारी बारा वाजता टेंभा शिवारात नदी पात्रात पोलिसांच्या आणि बचाव पथकाच्या हाती लागला. कालपासून वडनेरचे ठाणेदार घनश्याम पाटील, जमादार सचिन रोकडे, जितेंद्र वैद्य, समीर कामडी, प्रशांत निरगुडवार यांनी शोधा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. दोन्ही मृतदेहाचे वडनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर या गावात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.