शासकीय योजनांचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी कुंभेजकर

03 Oct 2025 17:44:09
वाशीम,
dc kumbhejkar नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. प्रत्येक विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. नागरिकांनी योजनांची माहिती संग्रही ठेवावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. सेवा पंधरवड्याच्या औचित्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आदीसेतू शिबिराचे आयोजन मालेगाव तालुयातील मुसळवाडी येथे करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी कुंभेजकर बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार दीपक पुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे, गटविकास अधिकारी रमेश कंकाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक आदी उपस्थित होते.
 
 

kumbhejkar 
 
 
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान राबविले जाते. सेवा पंधरवडा या अभियानाच्या माध्यमातून योजनांची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने आदी सेतू शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत विविध विभागांच्या योजनांचा देखील माहिती दिली. अ‍ॅग्रीस्टॅक योजनेतून फार्मर आयडी बनवून कृषी योजनांचा लाभ घ्यावा. कुटुंबांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तयार करून घ्यावे. कार्यक्रमस्थळी असलेल्या विविध स्टॉलच्या माध्यमातून अर्ज भरून घ्यावेत असे आवाहनही यावेळी केले.
प्रास्ताविकात तहसीलदार दीपक पुंडे यांनी सेवा पंधरवडामध्ये राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. तालुकास्तरीय अधिकार्‍यांनी विविध योजनांची माहिती दिली.dc kumbhejkar यामध्ये तालुका कृषी अधिकारी यांनी रोहयो अंतर्गत सिंचन विहीर, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, फळबाग योजना, कृषी अवजारे, दालमिल, चक्की, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, बचतगटांना उद्योग अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला नायब तहसीलदार रंजना गोरे, ग्राममहसुल अधिकारी महादेव डाखोरे, मंडळ अधिकारी तुकाराम इप्पर, मंडळ कृषी अधिकारी प्राजक्ता कुचेकर, वैद्यकीय अधिकारी आशिष बियाणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, नवदुर्गा संस्थान ट्रस्टचे संचालक मंडळ, नागरिक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.संचालन राजेश सुर्वे यांनी केले. गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबीराला लाभला.
Powered By Sangraha 9.0