गोविंदराव वंजारी कॉलेजमध्ये हडूप कार्यशाळा

03 Oct 2025 18:14:40
नागपूर,
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात बी.टेक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “हडूप इकोसिस्टीम फॉर बिग डेटा ॲनालिटिक्स” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

vairalkar 
 
 
 
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून सेंट व्हिन्सेंट पल्लोटी कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. आशिष दांडगेकर आणि प्रा. अभिनव मुले यांनी बिग डेटा तंत्रज्ञान, हडूप आर्किटेक्चर व उद्योगातील अनुप्रयोगाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.Govindrao Vanjari Collegeकार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण, डीन अकॅडेमिक्स डॉ. राकेश श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. आयटी विभाग प्रमुख प्रा. प्रशांत गुमगावकर, विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेचे संयोजन प्रा. अरविंद गणवीर यांनी केले. आभार प्रदर्शन. रिया जैस हिने केले. अमर सेवा मंडळाचे सचिव आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी, कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी आणि प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सौजन्य:मनोज वैराळकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0