हिंगणघाट,
vijayadashami-festival : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने विजयादशमी महोत्सवाचे करण्यात होते. यावेळी शस्त्र पूजन व रावण दहन करण्यात आले. या वेळी आ. समिर कुणावार, महंत सुरेशशरण शास्त्री महाराज, माजी आमदार राजू तिमांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, विहिंप वर्धा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद धुर्वे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, गुड्डू शर्मा, चंदू मावळे, जितेंद्र कुकसे, सुरेंद्र आगरे, गजानन मसाये व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वते महंत भागीरथी महाराज यांनी हिंदू रक्षणासाठी सज्ज राहण्याचे व सनातन संस्कृतीच्या जपणुकीचे आवाहन केले.
शस्त्र पूजन सोहळ्याला प्रचंड उत्साह होता. पारंपरिक पद्धतीने शस्त्रांची पूजा करण्यात आली. सामूहिक घोषणाबाजी केली. या कार्यक्रमात नागपूर येथील कलाकारांचे नृत्य आणि हिंगणघाट येथील सुतवणे कोचिंग लासच्या विद्यार्थ्यांचे रामलीला सादर केली.
रावणाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. फटाका शो करण्यात आला.
प्रस्ताविक अतुल त्रिवेदी यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन शरद कोणप्रतिवार यांनी केले. यशस्वीतेकरिता अजय भोगं, सचिन धारकर, अनुकूल कोचर, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात विहिंप, बजरंग दलाचे स्थानिक तसेच जिल्हा पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.