कामगार द्रोही कायद्याचा पुनर्विचार करा; शासकीय परीपत्रकानुसार वेतन द्या

03 Oct 2025 18:25:20
हिंगणघाट,
government wages कामगारांच्या कामाचे तास ८ वरून १२ करण्याचा सरकारचा निर्णय हा दुर्दैवी आहे. अतिरित कामाच्या तासांमुळे अनेकांवर बेरोजगारीची समस्या भविष्यात निर्माण होऊ शकते. या सर्व बाबींचा शासनाने गांभीरपणे विचार करावा असे आवाहन ज्येष्ठ सहकार नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले. स्थानिक महावीर भवन येथे २ रोजी आयोजित गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
 
 

wedges 
 
 
 
ते पुढे म्हणाले की, दिवसभराच्या २४ तास मधून ८ तास आराम, ८ तास परिवारासोबत व ८ तास कामं हे नियोजन ठीक आहे. परंतु, नवीन कायदा हा कामगारांच्या हितासाठी आवश्यक नसल्याचे ते म्हणाले. गिमा टेस कंपनीच्या कामगारांना परीमंडळ दोन नुसार वेतन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केले. याबाबत गिरणी व्यवस्थापकांनी पुढाकार घेऊन युनियनसोबत चर्चा करावी व कामगारांवरील अन्याय थांबवावा. जाम येथील पिवी टेसटाईल्स येथेही कामगारांचे आर्थिक शोषण होतं असून या गिरणीच्या कामगारांना योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही या पुढे पिवी गिरणीकडेही लक्ष देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.कामगारांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी दरवर्षी दसर्‍याला कामगार मेळावा आयोजित करण्याची घोषणा अ‍ॅड. कोठारी यांनी केली.
माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगारांना कामगार कायद्या प्रमाणे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे तर आफताब खान यांनी तो कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी केली.government wages डॉ. निर्मेश कोठारी यांनी सतत १२ तास कामं केल्यामुळे कामगारांवर मोठा तणाव येतो. १२ तास काम करता करता तो अनेक व्याधीचा शिकार होईल म्हणून सरकारने मानवतेच्या दृष्टीने हा कायदा त्वरित मागे घ्यावा अशी विनंती केली. माजी नगरसेवक अनिल भोंगाडे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन दीपक माडे यांनी केले. या मेळाव्याला प्रचंड संख्येत कामगार उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय मिल मजदूर संघ हिंगणघाट, महाराष्ट्र सुती मिल मजदूर संघ वणी, विदर्भ सुती मिल मजदूर संघ वणी (हिंगणघाट) या संघटनांच्या वतीने करण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0