परतवाड्यात लॉरेन्स बिष्णोई टोळी सक्रीय?

03 Oct 2025 21:43:28
अचलपूर, 
lawrence-bishnoi-gang : दसर्‍याच्या दिवशी परतवाडा शहरातील ब्राह्मणसभा कॉलनी व खापर्डे प्लॉट भागात मुंबई, नागपूर, अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने दोन घरावर धाड १३ युवकांना ताब्यात घेतले. मुंबई क्राईम ब्राच त्यांची सखोल चौकशी करीत आहे. या युवकांचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचा संयश पोलिसांना आहे.
 
 
K
 
प्राप्त माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेने लॉरेन्स बिष्णोई टोळी संबंधित एका संशयिताचा फोटो अमरावती व नागपूर गुन्हे शाखेला पाठविला होता. तो परतवाडा येथे वास्तव्यास असल्याची माहिती देण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे अमरावती व नागपूर गुन्हे शाखा यांनी गुरूवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ब्राह्मण सभा कॉलनीतल्या एका घरावर धाड टाकली. दार उघडण्याचा प्रयत केला असता आतून कुठलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍याने स्वतःच्या बंदुक मधून हवेत एक वार्निंग फायर करून आतमध्ये असलेल्यांना दार उघडण्यास सांगितले.
 
 
तरी देखील दार उघडत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने दार उघडले. तेथून ८ संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांना हवा असलेला संशयित तेथे नव्हता, तो दुसर्‍या ठिकाणी राहत असल्याचे कळताच पथकाने खापर्डे प्लॉट भागातल्या एका घरी याच पद्घतीने प्रवेश केला. तेथे असलेल्या ५ जणांना असे एकूणन १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन परतवाडा ठाण्यात नेत चौकशी सुरु केली. हा प्रकार दसर्‍याच्या दिवशी असल्यामुळे नागरिक मोठ्या संखेने स्थानिक परिसरात जमले होते. जुळ्या शहरात अफवांचा बाजार सुरू झाला. दुसर्‍या कोणत्याही ठिकाणी गोळीबार किंवा इतर प्रकार घडला नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे देखील पोलिस सुत्रांनी सांगितले आहे .
 
 
मुंबई क्राईम ब्राचचे पथक एका आरोपीच्या शोधात असताना त्यांना १३ संशयित आढळल्याने परतवाडा शहरात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुंबई, नागपूर व अमरावती गुन्हे शाखेने परतवाडा शहरात संयुक्त कारवाई केली असून तेराही संयशित हरियाणा येथील रहिवाशी आहे. वृत्तलिहोस्तर मुंबई गुन्हे शाखा चौकशी करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0