महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा लवकर अमलात आणावा

03 Oct 2025 22:33:46
विवेक विचार मंचचे शासनाला निवेदन
 
नागपूर,
Maharashtra Public Safety Act महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा जनहिताचा कायदा असून देशविरोधी कारवाया करणार्‍या संबंधित किंवा संशयित आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई या कायद्याअंतर्गत होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा कायदा लवकर अमलात आणावा,अशी मागणी विवेक विचार मंच व इतर सहयोगी संघटनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
 
 
vivek-vichar-manch
 
विवेक विचार मंच व इतर सहयोगी संघटना यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल लाइन्स येथे जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने निवेदन देण्यात यावेळी विवेक विचार मंचचे पूर्व विदर्भ संयोजक राजू साळवे, नागपूर संयोजक सचिन जांभूळकर, सुनील किटकरू, अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड.मधुकर इल्लुरकर, अ‍ॅड.विवेक कोलते, अ‍ॅड.दीपिका गवळी, अ‍ॅड.भाग्यश्री दिवाण, अ‍ॅड.समीर पराते, अभिजित सिंह ठाकुर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचे स्वागत करीत जनसुरक्षा कायद्याला भक्कमपणे समर्थन देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
 
 
Maharashtra Public Safety Act महाराष्ट्र कायद्याअंतर्गत जे कोणी दोषी आढळतील त्या दोषींवर कडक कारवाई करण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत प्राप्त होणार आहे. विवेक विचार मंच, अधिवक्ता परिषद, भारतीय विचार मंच, बिरसा मुंडा विचार मंच, स्वाभिमान बहुउद्देशीय संस्था, मायमाउली बहुउद्देशीय संस्था, संघमित्रा बुद्ध विहार समिती आदी संस्थांनी या कायद्याचे जोरदार समर्थन करीत शासनाचे अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0