नागपूर,
Morbhavan Nagpur पर्यटन दिनानिमित्त मोरभवन येथे पर्यटन लेखक श्रीकांत पवनीकर यांचा “भ्रमणगाथा” हा स्लाईड शो पार पडला.प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, “जंगलात जाऊन फक्त वाघ पाहण्यातच अर्थ नाही, तर तेथील शांतता, निसर्गाचे स्वर, वृक्ष, नदी, आकाश यांचा अनुभव घ्या. पवनीकरांच्या लेखनातून हे सर्व जिवंत भासते.”अध्यक्षस्थानावर पर्यटन संचालनालयाचे उपसंचालकप्रशांत सवाई होते. विशेष उपस्थिती म्हाडाच्या दक्षता सवाई यांची होती.
स्लाईड शोमध्ये जगप्रसिद्ध प्रवासी तसेच भारतातील अपरिचित व पौराणिक स्थळांचा इतिहास उलगडण्यात आला.Morbhavan Nagpur या वेळी ९१ वर्षीय संस्कृत विदुषी डॉ. विमलताई पवनीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सौजन्य :श्रीकांत पवनीकर,संपर्क मित्र