ऐतिहासिक! मेट्रोच्या प्रवाशांमध्ये विक्रमी वाढ — एकाच दिवशी १.५० लाखांहून अधिक प्रवासी

03 Oct 2025 14:58:26
नागपूर,
Nagpur Metro दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिन या पवित्र दिवसानिमित्त नागपूर मेट्रोमध्ये प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, एका दिवसात १,५०,५९९ प्रवाशांनी मेट्रोसेवा वापरली.या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता नागपूर मेट्रोने आपल्या सेवा २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवल्या. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येणार्‍या नागरिकांची व भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवा वाढवण्यात आल्या.
 

Nagpur Metro 
दिवसभरात प्रवाशांचा उदंड प्रतिसाद पाहता नागपूर मेट्रोवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येते. प्रवासाच्या सुरक्षितता, वेगवान सेवा आणि आरामदायक प्रवासासाठी नागरिक मेट्रोचा अधिकाधिक वापर करत आहेत. आता आपल्या सोयीसाठी आणि आरामदायक प्रवासासाठी वापर करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेला प्रतिसाद हा नागपूर मेट्रोच्या यशाचे प्रतीक आहे व शहराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
 
 
प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा
नागपूर मेट्रोच्या Nagpur Metro  शाश्वत आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देणारी असून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. सणासुदीच्या नागरिकांना एक विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला आहे. नागपूर मेट्रो आपल्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्यास सदैव कटिबद्ध असून भविष्यातही प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0