मराठा आरक्षण विरोधात युवकाची आत्महत्या

03 Oct 2025 20:38:43
वणी, 
Opposition to Maratha reservation यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे ब्राम्हणी फाटा परिसरात सोमवार, २९ सप्टेंबर रोजी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी मिळालेल्या चिठ्ठीमुळे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खळबळ माजली आहे. आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव अजय शेंडे (वय ३०, कायर, ता. वणी) असे असून त्याने कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवली. वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्यांतर्गत कायरचा युवक अजय शेंडे हा १८ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. याबाबत कुटुंबियांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तो हरवल्याची तक्रारही नोंदवली. २९ सप्टेंबर रोजी वणी मार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ मंदिरामागे एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पडून असल्याची माहिती डायल ११२ वर मिळाली.
 

Ajay  dks 
 
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृताच्या पॅण्टच्या खिशातून मिळालेल्या मोबाईलवरून मृतक हा कायर येथून बेपत्ता असलेला अजय पुंडलिक शेंडे असल्याची खात्री पटली. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र दुसर्‍या दिवशी पडून असल्याचे ठिकाणापासून काही अंतरावर मोनिसिल कीटकनाशकची बाटली, पेन व कीटकनाशक खरेदी केल्याचे कृषी केंद्राचे बिल सापडले.अधिक बारकाईने पाहता कीटकनाशकाच्या बिलामागे ‘मी अजय शेंडे, राज्य सरकारने ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे आत्महत्या करीत आहे’ असा मजकूर लिहून होता.
 
 
Opposition to Maratha reservation ही घटना उघड झाल्यानंतर वणी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी उडाली आहे. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाविरोधात आत्महत्येची ही राज्यातील पहिलीच घटना असल्यामुळे राजकीय व सामाजिक पातळीवर याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आत्महत्येमुळे राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधक जोरदार आक्रमक भूमिका घेऊ शकतात. ओबीसी आरक्षणातून मराठांना कोटा देण्याच्या निर्णयामुळे आधीच सामाजिक संघर्षाचे चित्र स्पष्ट झाले आता आत्महत्येच्या या घटनेनंतर तो संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
 
 
Opposition to Maratha reservation अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष सुनयना येवतकर यांनी बुधवारी यवतमाळचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या घटनेची चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे ओबीसी व मराठा समाजातील संघर्षाचा मुद्दा पुन्हा पेट घेईल, असा अंदाज वर्तवला आहे. ही आत्महत्या केवळ एका तरुणाचा जीव घेणारी घटना नाही तर राज्यातील सामाजिक व राजकीय समीकरणे हादरवणारा धक्का ठरण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0