मुख्याध्यापक पदोन्नती संदर्भात जिल्ह्यातील शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू

03 Oct 2025 23:24:05
यवतमाळ, 
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे Principal promotion- Hunger strike begins मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत झालेल्या विलंबाविरोधात गांधी जयंतीदिनी यवतमाळ जिल्हा परिषद साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. ३० सप्टेंबर २०२५ रोजी निवृत्त झालेल्या पात्र शिक्षकांना पदोन्नतीचा न्याय्य लाभ मिळावा, यासाठी समितीने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तथापि, प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय न घेता आल्याने शिक्षकवर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
 
 
uposhan
 
या अन्यायाविरोधात व पदोन्नती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी समितीने व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून योग्य आदेश निघेपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार यांनी स्पष्ट केले.
 
 
Principal promotion- Hunger strike begins या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, जिल्हा कार्यकारिणी सभेत तालुकानिहाय जबाबदार्‍या निश्चित करून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. शिक्षक बांधवांची या आंदोलनाला बळ देत असून, दसरा आणि गांधी जयंतीचा शुभयोग साधत या लढ्याला विशेष ऊर्जा प्राप्त झाली आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी लढणार्‍या या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांचे संपूर्ण समर्थन लाभले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुभाष पारधी यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0