मुनघाटे महाविद्यालयाचे प्रो. अभय सोळुंके यांना उत्कृष्ट प्राध्यापकाचा पुरस्कार

03 Oct 2025 18:06:02
कुरखेडा,
prof abhay solunke दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रो. डॉ. अभय साळुंखे यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राध्यापकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. डॉ. सोळुंके हे मुनघाटे महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून मागील अनेक वर्षापासून कार्यरत असून महाविद्यालयाच्या आयक्यूएसीचे समन्वयक म्हणून अनेक वर्षापासून उत्कृष्ट धुरा सांभाळीत आहेत. त्यांची 20 हून अधिक पुस्तके व संदर्भ ग्रंथ विविध विद्यापीठात अनेक विद्यार्थी अभ्यासत आहेत.
 
 

abhay salunke 
 
 
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इत्यादी विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे सदस्य, मुंबई विद्यापीठ येथील कॉपीराईट सिल्याबसचे सदस्य म्हणून तसेच इंग्लंड येथील अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. साळुंके हे गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर कार्य करीत असून गोंडवाना विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे अध्यक्ष तसेच विद्या परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केलेले आहेत. यूजीसीद्वारा पुरस्कृत ऑटोनॉमस महाविद्यालयाचे परीक्षण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या आयएआयपी व आयपीआर समितीचे सदस्य तसेच ग्लोबल असेसमेंट अँड अकॅड्रेशन कन्सर टीमचे सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. इंडियन सायन्स काँग्रेस, मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया, असोसिएट ऑफ मायक्रोबायोलॉजी ऑफ इंडिया, बी. आर. एस. आय. बायोलॉजी टीचर्स असोसिएशनचे सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. भारत सरकारच्या इनोव्हेशन अ‍ॅम्बेसिडर म्हणूनही कार्य करीत आहेत. महाविद्यालयाच्या एनडीएएलआय क्लबचे ते मागील तीन वर्षापासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.prof abhay solunke गोंडवाना विद्यापीठाच्या आचार्य पदवीचे मार्गदर्शक म्हणून कार्य करीत असून त्यांचे अनेक विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी संपादन केलेली आहे. त्यांचे तीन पेटंट व तीन कॉपीराईट प्रकाशित आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या भव्य समारंभात त्यांना गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केलेले आहे.
Powered By Sangraha 9.0