नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारे संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संगीत विभागाने गांधीजींच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. सर्व शाखा विभाग प्रमुखांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबनाच्या विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शाचा अंगीकार करून राष्ट्र निर्माणासाठी पुढे यावे असे आवाहन केले.
प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांनी दोन्ही नेत्यांचे साधेपणा व त्याग प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ आणि संचालिका . लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. Ramakrishna Wagh College सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प करायला हवा असे प्रास्ताविक प्रा. सुषमा वडस्कर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी वाघ यांनी केले, आभार प्रा. पुनम मेश्राम यांनी मानले.
सौजन्य:सायली लाखे /पिदळी ,संपर्क मित्र