जेष्ठ नागरिकच कुटुंबाचे खरे आधारस्तंभ

03 Oct 2025 11:54:34
भारतीय मजदूर संघाच्या सभागृहात वरिष्ठ नागरिक दिवस
नागपूर,
brigadier sunil gawpande वाढत्या लोकसंख्येबरोबर विविध समस्याही वाढत आहे.परावलंबी जीवन हे अधिकतम जेष्ठ नागरिकांच्या वाट्याला आले आहे.त्याचे प्रमुख कारण म्हणजेच बदलती सामाजिक होय. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या वेळी जेष्ठ व्यक्ती संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत असत. यातून जेष्ठ नागरिकच मार्ग काढू शकतात कारण तेच खरे कुटुंबाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडियर सुनील गावपांडे यांनी केले.

सुनील गावपांडे  
 
 
विदर्भ प्रदेश वरिष्ठ नागरिक परिसंघाच्या वतीने जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्त धंतोली येथील भारतीय मजदूर संघाच्या सभागृहात नागरिक दिवस प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ नागरिक परिसंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विवेक देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ नागरिक परिसंघाचे राष्ट्रीय महामंत्री चंद्रकांत देशपांडे, महामंत्री सुधीर डबीर, संघटनमंत्री शंकर पहाडे उपस्थित होते.brigadier sunil gawpande महामंत्री चंद्रकांत देशपांडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, कुटुंब सुखी तर समाज सुखी आणि समाज सुखी तर देश हि त्रिसूत्री आपण कायम लक्षात ठेऊ या.आपल्या जीवनाचे सार्थक होईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर पहाडे, विवेक देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0