सेवा हाच संकल्प, भारत हीच पहिली प्रेरणा : आमदार डॉ. नरोटे

03 Oct 2025 18:10:17
चामोर्शी, 
mla dr narote सेवा हाच संकल्प, भारत हीच पहिली प्रेरणा असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने स्वस्थ नारी-सशक्त परिवार या योजनेंतर्गत सर्वांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
 

narote 
 
 
शिबिरामध्ये सेवा आणि तपासण्या उपलब्ध करून दिल्या. रक्तदाब आणि हृदयाचे मूल्यमापन, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील साखर आणि पोषण स्थिती तपासणी, आरोग्य सल्ला व पोषण मार्गदर्शन सर्वांसाठी आरोग्य व कुटुंब कल्याणाशी संबंधित माहिती विविध विभागांतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमाद्वारे सामान्य जनतेपर्यंत सेवा व योजना पोहचवण्यात आल्या.mla dr narote नागरिकांच्या आरोग्याची जपणूक करून संपूर्ण कुटुंब अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न निश्‍चितच यशस्वी होईल, असा विश्‍वासही यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, नगराध्यक्षा जयश्री वायललवार, भाजपा जिल्हा सचीव दिलीप चलाख, निरज रामानुजनवार, नरेश अलसावार, साईनाथ बुरांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण किलनाके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्र पेद्दाल्ला, व सहकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0