विश्वसंचार
मल्हार कृष्ण गोखले
Solomon Islands चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सेनापतींना तैवानचा घास घेण्यासाठी २०२७ हे वर्ष ठरवून दिले आहे. चिनी सेनापती त्या दृष्टीने जोरदार तयारी आहेत. चीनकडे आता ‘डी.एफ. २६ बी’ नामक दोन हजार सागरी मैल पल्ल्याची क्षेपणास्त्रे सज्ज असून त्यांना ‘एअरक्रॉफ्ट कॅरियर किलर’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे चीन अमेरिकेच्या प्रचंड नौदल क्षमतेला अजिबात घाबरत नाही. ही सगळी माहिती आपल्याला आहेच.
आपल्याकडेही आता मोठे नाविक बळ आहे. म्हणून चीनने त्याचा खोडसाळपणा सोडलेला नाही. जिथे मिळेल तिथे बोट शिरकवण्याचा त्याचा सतत प्रयत्न चाललेला असतो. १० जुलै ते ८ ऑगस्ट २०२५ या साधारण महिनाभराच्या कालखंडात अमेरिकेने रेफोरपॅक-२५ हा युद्धसराव केला. त्यानंतर महिनाभरातच म्हणजे १० सप्टेंबर २०२५ या दिवशी Solomon Islands ‘सॉलोमन आयलंडस्’ या देशाची राजधानी होनिआरा या शहरात पॅसिफिक आयलंड फोरम या १८ देशांच्या संघटनेची वार्षिक बैठक तैवान हा देशही या संघटनेचा सदस्य देश आहे. तर, चीनने यजमान सॉलोमन आयलंड सरकारपाशी असा हट्ट धरला की, तैवानी प्रतिनिधींना या बैठकीला बोलावू नये आणि बोलावलेच तर बोलू देऊ नये.
काय आहे हा प्रकार? Solomon Islands सॉलोमन आयलंड सरकारने कुणाला बोलवावे अगर बोलावू नये, हे चीन कोण सांगणार? हे नीट समजण्यासाठी महासागर आणि त्याच्या विस्तीर्ण क्षेत्रातील द्वीपे यांची भूराजनैतिक स्थिती समजून घ्यायला हवी. पॅसिफिक महासागरात जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांसह अक्षरशः हजारो छोटी-मोठी बेटे-द्वीपे किंवा द्वीपसमूह आहेत. या द्वीपसमूहांना गायक्रोनेशियन, मेलनेशियन आणि पॉलिनेशियन द्वीपसमूह या नावाने ओळखले जाते. आता यापैकी मायक्रोनेशियन द्वीपसमूह अमेरिकेशी संबंध ठेवून आहे तर मेलनेशियन आणि हे अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी संबंध ठेवून आहेत. म्हणजे एकप्रकारे ते त्या-त्या देशांच्या छत्रछायेखाली किमान गेली दोन-अडीचशे वर्षे आहेत. ऑस्ट्रेलिया हा एक खंड आहे. न्यूझीलंड हा एक वेगळा देश असला, तरी खंडदृष्ट्या त्याला ऑस्ट्रेलियाचाच भाग मानतात. उर्वरित सुमारे २२ देश म्हणजे अक्षरशः नकाशावरचे ठिपके आहेत. अनेक देश एवढे आहेत की, त्यांचे स्वतःचे सैन्य दल सोडाच, पोलिस दलसुद्धा नाही.
तर, अशा या चिमुकल्या देशांपैकी १८ राष्ट्रांनी एकत्र येऊन ‘पॅसिफिक आयलंडस् फोरम’ अशी आपली संघटना सुरू केली. किरीवाती, न्यू कॅलेडोनिया, पापुआ न्यूगिनी, टुवालू, कुक आयलंडस्, मार्शल आयलंडस्, सामोआ, वानुआतु, फिजी, मायक्रोनेशिया, निऊ, सॉलोमन आयलंडस्, फ्रेंच पॉलिनेशिया, नाऊरु, पालाऊ, टोंगा, आणि न्यूझीलंड हे ते १८ देश होत. साधारणपणे १९७१ साली प्रथम यातल्या ७ देशांनी मिळून ही संघटना स्थापन केली. मग वेळोवेळी त्यात भर पडत गेली. या मूळ १८ देशांखेरीज आणखी ४ देश हे सहयोगी सदस्य आहेत. शिवाय जगभरातले २१ देश हे संवादी सदस्य आहेत. यामध्ये खुद्द चीन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान, तुर्कस्तान, फिलिपाईन्स, थायलंड, कॅनडा, स्पेन, नॉर्वे अशा देशांसह भारतसुद्धा आहे आणि विकास कार्यक्रमातील जोडीदार म्हणून तैवान हा एकमेव देश आहे.
Solomon Islands आता आपल्याला असे वाटेल की, नकाशावरच्या ठिपक्याएवढ्या या देशांना का एवढे महत्त्व आहे? तिथे एखादे धान्य अमाप पिकते? की, त्या भूमीत सोन्याच्या खाणी आहेत? की, काळ्या म्हणजे तेलाच्या खाणी सापडल्या आहेत? तर, याचे उत्तर असे आहे की, भूराजनैतिकदृष्ट्या पॅसिफिक आणि त्याच्या जवळचा हिंदी महासागर हे आगामी तिसर्या महायुद्धाचे प्रमुख रणक्षेत्र राहणार आहे. इसवी सनाच्या सुमारे १५ व्या शतकापासून युरोपीय राष्ट्रे विज्ञान-तंत्रज्ञानात पुढे सरसावत गेली. त्यातून त्यांच्यामध्ये नवा राष्ट्रवाद फैलावला. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी जगभर आपले राष्ट्रवादाचा अतिरेक होऊन २० व्या शतकात दोन अत्यंत भीषण महायुद्धे झाली. अतोनात विध्वंस झाला. या सर्वांचा केंद्रबिंदू, युरोपखंड आणि त्याच्या लगतचे अटलांटिका महासागर नि भूमध्य समुद्र हे होते. पण आता हा केंद्रबिंदू बदलला आहे. पॅसिफिक समुद्राच्या एका काठावरची अमेरिका आणि दुसर्या काठावरचा चीन हे आता संघर्षातले मुख्य भिडू असणार पॅसिफिक महासागर आणि त्याच्या लगतचा हिंदी महासागर या क्षेत्रातील प्रत्येक देश या संघर्षात अपरिहार्यपणे ओढला जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण क्षेत्रातला नकाशावर ठिपका भासणारा भूमीचा प्रत्येक तुकडा महत्त्वपूर्ण बनत आहे.
अमेरिकन नौदलाने या संपूर्ण क्षेत्राला ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ असे नाव दिलेले असून पृथ्वीच्या पाठीवरचा ५२ टक्के भाग या क्षेत्रात मोडतो. साली जपानचा पराभव केल्यापासूनच अमेरिकन नौदलाने या क्षेत्रावर पूर्णपणे वर्चस्व ठेवलेले आहे. हे वर्चस्वच चीनला मोडून काढायचे आहे. त्यासाठी त्याने सध्या ऑस्ट्रेलियाच्या छत्रछायेखालील मेलनेशियन द्वीपसमूहाकडे मोहरा वळवलेला आहे. या द्वीपसमूहातील अनेक देशांना चीन विविध प्रकारे मदत देऊन उपकृत करून ठेवतो आहे. एक उदाहरण पहा. यातल्या अनेक देशांकडे पोलिस दलसुद्धा सॉलोमन आयलंडस् या देशाकडे स्वतःचे पोलिस दल आहे खरे; पण ते प्रशिक्षित नाही. २०२३ मध्ये सॉलोमन आयलंडस् देशाने ‘पॅसिफिक गेम्स’ असे खेळांचे सामने, आपल्याकडच्या ‘एशियाड’च्या धर्तीवर आयोजित केले. त्यासाठी सॉलोमनी पोलिस दलाला प्रशिक्षित करण्यासाठी चिनी पोलिस दल आले. पॅसिफिक गेम्स संपल्यावर खेळाडू आणि अन्य संबंधित मंडळी आपापल्या देशात परतली. आज २०२५ साल संपत आले, तरी चिनी पोलिस अजून सॉलोमन आयलंडस्मध्येच आहेत.
Solomon Islands या द्वीपसमूहरूपी देशांमध्ये अनेक ठिकाणी जुन्या धावपट्ट्या आहेत. मुळात त्या दुसर्या महायुद्ध काळात जपानी नौदलाने बांधल्या होत्या. १९४५ साली महायुद्ध संपल्यावर त्या निरुपयोगी झाल्या. चिनी कंपन्या त्या धावपट्ट्या पुन्हा ठाकठीक करीत आहेत. अनेक ठिकाणी छोट्या-छोट्या निर्मनुष्य बेटांवर कंपन्या छोटे छोटे फेरी धक्के उभे करीत आहेत. या सगळ्या उद्योगांचा उपयोग असा आहे की, ठरलेल्या कार्यक्रमानुसार २०२७ साली जेव्हा चीन तैवानवर आक्रमण करेल, तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या बाजूने होणारी हवाई आणि आरमारी हालचाल रोखून धरेल.
१० सप्टेंबर २०२५ ला पॅसिफिक आयलंडस् फोरमच्या बैठकीत तैवानला न बोलावण्याची सूचना Solomon Islands सॉलोमन आयलंडस् देशाला देणे, ही कदाचित अशीही सूचना असू शकते की, २०२७ ही आम्ही आक्रमणाची वेळ ठरवली असली, तरी त्या आधीच आक्रमण करू नका, अशी काही कोणी आम्हाला शपथ घातलेली नाही. पिवळ्या चीनचा लाल ड्रॅगन आणि अमेरिकेचा अंकल सॅम असे दोन्ही पहिलवान तूर्त आखाड्याच्या दोन्ही कडांवर शड्डू ठोकून उभे
(लेखक प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत.)
७२०८५५५४५८