नागपूर,
Survenagar Garden Hall आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ, सुर्वेनगर-२२ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम विरंगुळा केंद्र, सुर्वेनगर गार्डन हॉल येथे विनोद गुडधे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.मुख्य अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छाने करण्यात आले.प्रास्ताविक राम पवनारकर यांनी केले तर सचिव. जितेंद्र भोयर यांनी वार्षिक अहवाल वाचला.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फंडातून विरंगुळा केंद्र उभारून दिल्याबद्दल विशेष आभार मानले.

सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. मागील वर्षी निधन झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.७५ वर्षे पूर्ण केलेल्या ३४ ज्येष्ठ सभासदांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला. Survenagar Garden Hall सहस्त्रदर्शन सोहळा पार पाडलेल्या ४ ज्येष्ठांचा शॉल, श्रीफळ, मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संचालन रत्नाकर येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र मुलनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा भोयर, अर्चना ठाकरे, सविता राऊत, कृष्णराव खोब्रागडे, सतीश मांडवकर, प्रमोद डाखोळे व प्रदीप गावंडे यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:सपना रोडी,संपर्क मित्र