ज्ञानेश्वर मिरगे
शेगाव
Gyaneshwar Mirge library सुसंवादाची बैठक जिथे होते ती वास्तु म्हणजे वाचनालय असे हभप ज्ञानेश्वर मिरगे यांनी म्हटले आहे. स्टेटबँक काँलनीतील हनुमान मंदिरा जवळील सार्वजनिक हाँल मधे महारुद्र आपले वाचनालयाचे उद्घाटन आज झाले त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन ते बोलत होते या वेळी अध्यक्ष म्हणुन चतुर्भुज मिटकरी होते.
यावेळी बोलताना मिरगे म्हणाले कि दस-याच्या मुहुर्तावर या वाचनालयाचा शुभ आरंभ झाला असुन माणसामधील सुसंवादा करीता वाचनालय अत्यंत महत्वाची भुमिका निभवु शकतात तसेच ग्रंथ हे गुरू असुन त्यामुळेच ज्ञान प्राप्त होते म्हणुन सतत वाचत राहिले पाहिले. यावेळी अध्यक्ष स्थानी असलेले मिटकरीकाका यांनी उपस्थीतांना नित्य योग करण्याचा सल्ला दिला आणि ज्ञानासोबत आरोग्य जपण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमाचे संचलन प्रा भुषण महाजन यांनी केले प्रास्ताविक गोतमारे यांनी केले यावेळी राजु भिसे अरविंद ईंगळे,जयक्रुष्ण बलाळ ,रवि थोडगे, अर्चना जोशी सुर्यकांत देशपांडे हेमंत खेडकर सुबोध पटवर्धन,आरती देशपांडेवैशाली गोतमारे ईत्यादी सह महिला पुरुष उपस्थीत होत