मुंबई,
tom cruise वय म्हणजे केवळ एक संख्या आहे, असं म्हणतात, आणि हे विधान खऱं ठरतंय ते हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ यांच्या बाबतीत. वयाच्या 63व्या वर्षी चौथ्यांदा लग्नाच्या तयारीत असल्याच्या बातम्या आता जोर धरत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी टॉम क्रूझ आपल्या वयापेक्षा तब्बल 26 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री अॅना डे आर्माससोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
टॉम क्रूझ tom cruise आणि अॅना यांचं नातं गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. जुलैमध्ये या दोघांना एकत्र वेळ घालवताना पाहिलं गेलं, तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. सुरुवातीला या चर्चांना केवळ अफवा मानलं जात होतं, मात्र आता काही माध्यमांनी दावा केला आहे की दोघंही लवकरच लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहेत.विशेष म्हणजे, या दोघांना साहसप्रिय जीवनशैलीची आवड आहे. त्यामुळे त्यांचं लग्नही पारंपरिक पद्धतीनं न होता अत्यंत थरारक आणि चित्रपटासारखं असणार असल्याची माहितीही समोर आली आहे. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, टॉम क्रूझ अंतराळात लग्न करण्याचा विचार करत आहे. या आधीदेखील तो अंतराळात चित्रपट शुटिंग करण्याच्या इच्छेने चर्चेत राहिला होता. त्यामुळे अंतराळात लग्न करण्याची कल्पना त्याच्यासाठी अतिशय रोमांचक ठरू शकते.
तसेच, स्कायडायव्हिंग करताना लग्नाच्या शपथा घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. एका सूत्रानुसार, “ते जे काही करतील ते नक्कीच हटके आणि पूर्वी कधीही न पाहिलेलं असेल.”टॉम क्रूझचं हे चौथं लग्न ठरेल. याआधी त्याने मिमी रॉजर्स, निकोल किडमन आणि केटी होम्स यांच्यासोबत विवाह केला होता, मात्र तिन्ही लग्नं घटस्फोटात समाप्त झाली. विशेष म्हणजे, केटी होम्ससोबतच्या नात्यावेळी टॉम क्रूझ जसा उत्साही आणि प्रेमळ दिसला होता, तसाच उत्साह सध्या अॅना डे आर्मासबाबतही दिसून येत असल्याचं काही जवळच्या मित्रांचं म्हणणं आहे.
टॉम क्रूझ आणि अॅना डे आर्मास दोघांनीही या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरीही चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जर हे वृत्त खरं ठरलं, तर टॉम क्रूझचं चौथं आणि सर्वात 'थरारक' लग्न लवकरच सर्वांच्या साक्षीने पार पडणार आहे.सध्यातरी हे केवळ अफवांच्या टप्प्यात असलं, तरी हॉलिवूडच्या या प्रेमकथेकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.