पुलगाव,
rajesh-bakane : स्टेशन चौक ते बायपास पेट्रोलपंप या मार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी बसवलेल्या स्ट्रीट लाईटचे लोकार्पण आ. राजेश बकाणे यांच्या हस्ते होताच दसर्याच्या पूर्वसंध्येला पुलगावनगरी तिरंग्याच्या प्रकाशाने उजळून निघाली.
लोकार्पणापूर्वी आ. बकाणे यांनी स्टेशन चौक परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वर्धा नदीवरील छोट्या पुलासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले. दहेगाव रेल्वे ते देवळी मार्ग लवकरच पुर्ण होईल, असे सांगितले. याप्रसंगी वर्धा जिल्हा भाजपा महामंत्री राहुल चोपडा, प्रदेश भाजप सदस्य राजीव बत्रा, पुलगाव शहराध्यक्ष प्रशांत इंगोले, महामंत्री अरविंद भार्गव, आदी उपस्थित होते.