नागपूर,
rajesh rokade सराफ व्यावसायिककांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. ज्वेलर्सना भेडसावणार्या सुरक्षेसोबतच विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्य पातळीवर ’दक्षता समिती’ स्थापना केल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहे. सराफांच्या सुरक्षा विषयक समस्यांचे निराकरण करण्यात मोलाची मदत होणार आहे.
दक्षता समितीत प्रामुख्याने विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा हे अध्यक्ष म्हणून काम बघणार आहे.rajesh rokade तर राज्यस्तरीय दक्षता समितीचे सदस्य म्हणून पोलीस महासंचालक यांचे विधी सल्लागार, पोलीस अधीक्षक, राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, नितिन खण्डेलवाल, राजेश रोकडे, शैलेश खरोटे, सुधाकर टांक, किरण अंदिलकर, महावीर गांधी, भरत ओसवाल, सुभाष वडाला गिरीश देवरमणी, अजीत पेंडुरकर, राजेंद्र दिंडोरकर, अमोल ढोमणे यांचा समावेश आहे.
नवरात्रीच्या शुभ प्रसंगी राज्य सरकारने दक्षता समितीची स्थापना करून एक अग्रगण्य पाऊल उचलले आहे. राज्यातील ज्वेलर्सना सुरक्षित वातावरणात व्यवसाय करण्यासाठी दक्षता समिती ही मोलाची भूमिका बजावणार आहे. दक्षता समितीचे वचन पाळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यमंत्री पंकज भोयर, विधान परिषदेच्या चित्रा वाघ यांचे आभार मानले आहे.