अंत नका पाहू आता वरूण राजा... करूणाकरा!

03 Oct 2025 21:22:56
बाळू मुंगले
वडनेर, 
farmers-rain : गेल्या दीड महिन्यापासून सलग अति मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला. खरीप हंगाम उद्ध्वस्त केला. दोन दिवस पावसाने उघडीप घेतली. मात्र, आज अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. वरूणराजा केव्हा बरसेल याची अजिबात खात्री नाही हे आज खरं ठरलं. पुन्हा बरसला. उध्वस्त झालेला आणि निसर्गाच्या प्रकोपाने धास्तावला बळीराजा आता तरी अंत पाहू नको, वरूण राजा करुणाकर असा आर्जव बळीराजा करीत आहे.
 
 
 
 
LK
 
 
 
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने निसर्गाचा प्रकोप झाला आहे की, पाऊस रुझाकार झाला आहे, हा प्रश्न भेडसावतोय. पावसाचं आजपर्यंत इतकं भयावह निजामीरूप कधीच पाहिलं नाही, असे वृद्ध सांगताहेत. सलगच्या मुसळधार पावसाने हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. नव्हे तर, शेत चिखलात गेली, माती खरवडून गेली, होत्याचं नव्हतं केलं.. मुख्य पीक असलेल सोयाबीन आणि कापूस काळवंडला.
 
 
मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आल्याने शेतकर्‍यांच्या आशा मावळल्या आहे. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन ही पिके काळवंडल्याने बळीराजा रडकुंडीला आला आहे. या नगदी पिकांच्या भरोश्यावर दसरा, दिवाळीच्या आनंदावर विरजन पडले आहे. निसर्गाच्या अवकृपेने आधीच आर्थिक चक्रव्युहात सापडलेला शेतकरी यावर्षीचा खरीप हंगाम पाण्यात गेल्याने बरीच वर्षे मागे पडला आहे. शासनाची तुटपुंजी मदत केवळ या आधारावर फुंकर ठरणार आहे.
 
 
संकटाच्या या काळात उध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम वक्तव्याने सुरू आहे. निसर्गाच्या कोपाला शेतकरी काही करू शकत नाही. पण सरकारच्या बेफिकिरीमुळे त्याची स्थिती अजून बिकट झाली आहे.
Powered By Sangraha 9.0