साडेतीन वर्षांत महिला अत्याचाराच्या ५,००० हून अधिक घटना

03 Oct 2025 17:53:48
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
women sexual assault Nagpur राज्यभरात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि काैटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गेल्या साडेतीन वर्षांत महिलांबाबतच्या 5 हजार 339 गुन्ह्यांच्या घटनांची नाेंद झाली आहे. तसेच उपराजधानीत 914 महिला-तरुणींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती समाेर आली आहे. शहर पाेलिस आयुक्त डाॅ. रविंद्रकुमार सिंगल यांनी महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी सकारात्मक प्रयत्न केले आहेत. दामिनी पथक, दुर्गा मार्शल, निर्भया पथकासह विविध पथके महिलांविरुद्धचे गुन्हे राेकण्यासाठी सज्ज आहेत. शहर पाेलिसांकडून कितीही कायदा-सुव्यस्थेचे दावे केले जात असले तरी गुन्हेगारीच्या नाेंदीवरुन महिलांवरील अयाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात मागील साडेतीन वर्षांत तब्बल 914 बलात्काराच्या घटना घडला.
 


women sexual assault Nagpur 
यामध्ये सर्वाधिक लग्नाचे आमिष दाखवून तर प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्याचा समावेश आहे. यासाेबतच 5 हजार 339 महिलांवर लैंगिक अत्याचार झाले तर विविध जाचाला कंटाळून जगणे असहाय्य झाल्याने 64 महिलांनी थेट आत्महत्येचा मार्ग पत्कारला.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय काेलारकर यांनी पाेलिस प्रशासनाकडे शहरातील महिला, ज्येष्ठ तसेच अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीवरून माहिती अधिकारात मागितली.पाेलिसांनी दिलेल्या लेखी उत्तरातून हे भीषण वास्तव पुढे आले आहे. वर्ष 2022 ते ऑगस्ट 2025 या तीन वर्ष आठ महिन्यांच्या कालावधीत शहरात एकूण 82,006 विविध प्रकारचे गुन्हे घडले. यातील 36 हजार 546 गुन्हे सिद्ध न हाेऊ शकल्यामुळे आराेपींना न्यायालयाने निर्दाेष साेडले आहे. यावरुन पाेलिस महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात किती गंभीर असतात, याची प्रचिती येते. गुन्हेगारीत सहभाग असणाèया 2,456 महिलांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले, हे विशेष.
 
 


ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा धाेक्यात
पाेलिसांनी महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला हाेता. मात्र,राज्यासह शहरात ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले, लूट, दराेडे तर हत्याच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. मागील साडेतीन वर्षात शहरात 17 ज्येष्ठ नागरिकांचे हत्याकांड घडले आहे. तीन ज्येष्ठांच्या घरी दराेडेखाेरांनी दराेडा टाकत दागिण्यांसह पैसे चाेरून नेले. 69 ज्येष्ठांना चाेरट्यांनी लूटल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत.
महिला बलात्काराची वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष घटना
2022 -260
2023- 262
2024- 256
2025 (ऑगस्ट) -136
Powered By Sangraha 9.0