खामगाव
open gym khamgaon -शहरातील टॉवर चौक येथील जीएसटी ऑफीस समोर खामगाव नगर परिषद व तालुका क्रिडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या ओपन जिम व वॉकिंग ट्रॅकचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर काल २ ऑक्टोंबर रोजी राज्याचे कामगार मंत्री ना. अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील नागरिकांना खुल्या आकाशाखाली आधुनिक व्यायाम सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या ठिकाणी तालुका क्रिडा संकुलाकडून व्यायामासाठी लागणारे साहित्य देण्यात आले आहे. तर खामगाव नगर परिषद कडून वॉकिंग ट्रॅक, सौंदर्यीकरण, रंगरंगोटी, काऊ गेट, वृक्षारोपण आदी कामे करण्यात येणार आहेत. या जीममुळे सर्व वयोगटातील नागरिकांना तंदरूस्ती, आरोग्य आणि फिटनेसकडे वाटचाल करण्यासाठी एक नवी संधी मिळणार आहे. शहराच्या वैभवात भर टाकण्यासह नागरिकांच्या सुविधेसाठी उभारण्यात येणाऱ्या अशा या ओपन जिम व वॉकिंग ट्रॅकचे उद्घाटन कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खामगाव नगर परिषदेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, उपमुख्याधिकारी आनंद देवकते, तालुका क्रिडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांच्यासह नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.