मोथा वादळ करेल बळीराजाच्या शेतमालाचा चोथा?

30 Oct 2025 17:36:20
सिंदी (रेल्वे), 
A quarter of Baliraja's farmland यंदा निसर्गाच्या मनात नकी काय आहे याचा उलगडा होत नाही. दरम्यान, पुन्हा जोरदार पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले. त्यामुळे येणारे मोथा नावाचे वादळ शेतमाल व शेतकर्‍यांचा चोथा करणार काय? अशी शंका शेतकरी व्यत करीत आहेत. सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. या आठवड्यात येणार्‍या मोथा चक्रीवादळामुळे सध्या सर्वत्र ढगाळी वातावरण तयार झाले. जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन मातीमोल झाले. सोयाबीनसारखे नगदी पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहे. परिणामी, बेरंग सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नाही. अनेकांना एकरी ५० किलो उत्पन्न हाती आले. त्यात खरे तर हार्वेस्टरचा खर्चही निघत नाही. आता शेतकर्‍यांच्या हाती कपाशीचे पीक उरले. परंतु, पाऊस उसंत घेत नसल्याने कपाशीला असलेली चार-दोन बोंड फुटत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शयतेमुळे पांढराफटक दिसणारा कापूस भिजून काळा होईल की काय, या चिंतेत शेतकरी सापडले आहे.
 

संग्रहित फोटो
 
 संग्रहित फोटो
 
कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे कोरडा कापूस घरी आणण्यासाठी शेतकर्‍यांचा आटापिटा सुरू आहे. मागील आठवड्यापासून पावसाची अधूनमधून रिमझिम असल्यामुळे कापसाची बोंडं काळपट पडली. कापूस हे शेतकर्‍यांचे नगदी पीक असून या पिकावरच शेतकर्‍यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. पेरणी ते वेचणीपर्यंत कापूस पिकावर वारंवार खर्च केला. आता उत्पन्नातून खर्च निघेल की नाही, अशी शंका व्यत होत आहे. बी-बियाणे, निंदण, रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरांचे वाढलेले दर शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडवत आहे. यावर्षीच्या पावसामुळे बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे.
 
 
 
माझ्याकडे १० एकर शेत असून ६ एकरात सोयाबीन आणि ४ एकरात कपाशीची लागवड केली. सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी दोन्ही पिकांनी दगा दिल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न पळसगावचे शेतकरी गजानन गिरडे यांनी उपस्थित केला. तर डोरली येथील बाबाराव लाजूरकर यांनीही आपली व्यथा मांडली. अडीच एकरात कपाशीची लागवड केली. बर्‍यापैकी बियाणे अंकुरले. पर्‍हाटी जोमदार दिसत होती म्हणून वारेमाप खर्च केला. परंतु, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीला फळधारणा झाली नाही. केवळ पालाच दिसत असून दोन-चार बोंड आहेत. ते संततधार पावसामुळे सडून खाली पडली. आता फुटलेल्या बोंडांचा काळा कापूस होण्याची शयता आहे. त्याला विक्रीसाठी नेल्यास व्यापारी यथोचित भाव देईल काय, हा प्रश्नही सतावत असल्याचे लाजूरकर यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0