तभा वृत्तसेवा
पारवा,
Acharya Devvrat मुंबईच्या राजभवनात राज्यपालांनी महाराष्ट्रातील निवडक गोआधारित शेती करणारे मार्गदर्शक यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी गोआधारित कृषी विषयावर मुख्यमंत्री यांनीही सर्व मंत्रिमंडळांची गाय आधारित कृषी विषयावर बैठक आयोजित केली होती. राजभवनातील बैठकीत राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यात गोआधारित शेती करण्यासाठी सुचवले आहे. भारतीय देशी गोवंशाशिवाय शेती करणे शक्य नाही. आजच्या युगात गायीची आवश्यकता प्रस्थापित करण्याची गरज आहे.
विषमुक्त अन्न हवे असेल तर विषमुक्त गाय आधारित शेतीच करावी लागेल. आम्हाला केवळ धार्मिकदृष्ट्या गोमातेचे महत्त्व नसून आर्थिकदृष्ट्यासुद्धा गोमाता आम्हाला संपन्न करणार आहे, असे राज्यपाल म्हणाले. गोसेवा गतिविधि भारतीय किसान संघ, महाराष्ट्र गोसेवा आयोग, विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभाग, ग्रामविकास, सर्वांनी मिळून गोआधारित शेतीला पुढे नेणे आवश्यक आहे. भविष्यात एक दिवसाचे पूर्ण गो आधारित प्रशिक्षण आयोजित करणार आहोत, असेही राज्यपाल म्हणाले.
आम्हाला समृद्ध व्हायचे असेल तर देशी गोवंशाशिवाय शेती करणे शक्य नाही. गुजरातमध्ये 2 लाख शेतकèयांना गो आधारित शेती करण्यासाठी परावर्तित केले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही गोआधारित शेतीसाठी शेतकèयांच्या भक्कमपणे पाठीशी राहणार आहे, असेही ते म्हणाले.मी स्वतः शेतकरी आहे. रासायनिक खते व औषधे आली तेव्हापासून जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. पुन्हा धरणीमातेला जिवंत करण्यासाठी गोमातेसोबत राहून काम करावे लागेल. यापुढे वंशसुधार, जास्त दूध देणाèया देशी गोमातांचा विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. गुजरातमध्ये तीन वर्षांच्या प्राकृतिक शेती प्रयोगानंतर 2 लाख शेतकèयांच्या घरी देशी गाय प्रस्थापित करण्यात यश आले आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र शासनाचे सचिव, शासकीय अधिकारी व गोसेवा गतिविधीचे सुधीर विद्वांस, रवींद्र देशमुख, भारतीय किसान संघ संघटनमंत्री चंदन पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा, मनीष वर्मा, उद्धव नेरकर, डॉ. नितीन मार्कंडेय. विश्व हिंदू परिषदेचे शिवप्रसाद कोरे, ग्रामविकासचे कैलास राठोड, उदय वैद्य, श्याम देशपांडे, माणिक देशपांडे, सतीश पालवे, प्रमोद लंगे, शुभांगी झिलपे, प्रल्हाद गावडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.