एअरपोर्टवर नोकरीचे आमिष दाखवून ७ लाखांची फसवणूक

30 Oct 2025 19:54:39
नागपूर,
airport job scam एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका वडिल व मुलाकडून तब्बल ७ लाख ७ हजार ८०० रुपये उकळणाऱ्या पती-पत्नीविरुद्ध बजाजनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी विजय सदाशिव बन्सोड (वय ६१ वर्षे, रा. क्वॉर्टर क्र. ६/४१, एनआयटी कॉलनी, अत्रे लेआउट, बजाजनगर, नागपूर) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या मुलगा तेजस बन्सोड (वय ३०) याच्याशी तक्रारदाराच्या भाच्याच्या ओळखीने आरोपी रोहित ओमप्रकाश थुल (वय ४०, रा. चिचभवन, नागपूर) याची भेट झाली होती.
 
 
 
airport job scam
आरोपीने खोटे सांगितले की त्याचे काका भूषण थुल हे पंतप्रधान कार्यालय दिल्लीत उच्च पदावर कार्यरत आहेत आणि ते नोकरी लावण्यात मदत करतील. या आमिषाला बळी पडून फिर्यादीकडून १७ जुलै २०२१ ते ५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आरोपी रोहित थुल व त्याची पत्नी शुभांगी लक्ष्मण सोमस्कर थुल (वय ३०) यांनी एकत्रित कट रचून विविध वेळा रोख व ऑनलाईन व्यवहाराद्वारे रक्कम स्वीकारली. परंतु, दीर्घकाळ उलटून गेल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने फिर्यादींनी पैसे परत मागितले असता आरोपींनी टाळाटाळ केली व कोणतीही रक्कम परत दिली नाही. या प्रकारामुळे फसवणुकीचा संशय बळावल्याने फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. तपासानंतर पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध कलम ४२०, ४०६, १२०(ब) भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या हालचालींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0