पांडुरंगेश्वर मंदिरात आवळीपूजन

30 Oct 2025 17:08:44
नागपूर,
Awali puja दीनदयाल नगर येथील पांडुरंगेश्वर मंदिरात आवळी पूजन करण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी सहभाग घेतला. गणपतीच्या पदांनी सुरुवात करून "गणपती राया पडते मी पाया, काय मागणे मागू रे" या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पांडुरंग, शंकर व देवीची भजने सादर करण्यात आली.
 

pujan
 
 
या पूजनात सर्व महिलांनी कुटुंबाच्या आरोग्यासाठी व सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.Awali puja पूजनानंतर आवळीच्या झाडाखाली सर्वांनी प्रसाद व जेवणाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमात रंजना ढोले, गीता चिकेरूर, संध्या दारव्हेकर, शीला जोशी, वंदना देशपांडे, वर्षा देशपांडे, प्रतिभा कातरकर, वैशाली पितळे, राधा कुरेकर, शामला पाठक, आरती भालेराव यांनी सक्रिय सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
सौजन्य:कल्पना वाराणशिवार,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0