मेलबर्न,
ben-austin-death भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून दुःखद बातमी समोर आली आहे. १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेन ऑस्टिनला नेटमध्ये सराव करताना डोक्याला चेंडू लागला आणि त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बेन ऑस्टिनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले आहे की, "नेटमध्ये फलंदाजी करताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १७ वर्षीय मेलबर्न क्रिकेटर बेन ऑस्टिनच्या दुःखद मृत्यूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे." क्रिकेट व्हिक्टोरियानेही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, "ऑस्टिन कुटुंब, बेनचे सहकारी, फर्न्ट्री गली क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन क्रिकेट समुदायासोबत आमच्या संवेदना आहेत." फर्न्ट्री गली क्रिकेट क्लब आणि एल्डन पार्क यांच्यातील टी-२० सामन्यापूर्वी बेन ऑस्टिन नेटमध्ये वॉर्म अप करत होता. ben-austin-death या दरम्यान, एक चेंडू त्याच्या डोक्यावर थेट लागला ज्यामुळे तो जखमी झाला. सहकारी खेळाडूंनी त्याला ताबडतोब मदत केली.
सौजन्य : सोशल मीडिया
चेंडू डोक्याला लागल्यावर बेन ऑस्टिनला तातडीने घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले. ben-austin-death काही मिनिटांतच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त येत होते. रिंगवुड आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मायकेल फिन यांनी बेन ऑस्टिनला सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा केली होती. पण शेवटी ऑस्टिन जीवनाची लढाई हरला.