मंगरूळनाथ,
Bhik Mango movement मौजे चिंचाळा येथील स्मशानभूमीच्या जागेची कागदपत्रे शासन दरबारी होती.ती कागदपत्रे काही अधिकारी कर्मचारी यांनी आर्थिक व्यवहार करून कागदपत्रे गहाळ केली असा आरोप ग्रामस्थांनी करीत २८ऑटोंबर पासून तहसील कार्यालयासमोर भिक मागो आंदोलन सुरू केले होते. दुसर्या दिवशीही या आंदोलनाची तहसीलदार मिलिंद जगदाळे यांच्या मध्यस्थीने आंदोलनाची सांगता करण्यात आली. तालुयातील चिंचाळा येथील स्मशानभूमीच्या लढा सुरू असून, काही कर्मचारी आणि अधिकार्यांनी दस्ताऐवज गहाळ केली. या महत्वपूर्ण कागदपत्रासाठी पैशांची वारंवार मागणी करत असल्याने आंदोलनकर्त्यां नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर कटोरा घेऊन भिकमांगो आंदोलन सुरू केले होते.या भीकेतून मिळालेले पैसै मागणी करणार्या अधिकार्यांना वरिष्ठामार्फत पाठवण्यात येईल, असे लेखी निवेदन एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिले होते.

या निवेदनाला अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी केराची टोपली दाखवल्याने व दुर्लक्ष केल्याने आंदोलनास प्रारंभ करण्यात आला होता. या आंदोलनाची सांगता २९ ऑटोबर रोजी तहसीलदार मिलिंद जगदाळे, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या मध्यस्थीने करण्यात आली
सदर आंदोलनात शिवाजी शंकर गजभार, पंजाबराव अंभोरे, पुंडलिक गजभार, भीमराव गजभार,गणेश हटकर, सदाशिव कालापाड, संजय गजभार, ग्यानुजी गजभार, नारायण गव्हाणे, आजाबराव शिंदे, नामदेव गजभार, यादव कालापाड, कैलास हजारे, गजानन हजारे,परसराम अंभोरे, किसन लहाने,राजु गजभार, गोविंदा अंभोरे, हनुमान लहाने यांच्यासह महिला सहभागी होत्या.