तळेगाव दशासर,
dcm pawar गुरुवारी औरंगाबाद - नागपूर महामार्गावरील तळेगाव दशासर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज वानखडे यांच्या नेतृत्वात काळे झेंडे दाखवले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळ येथे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी व एका बैठकीत उपस्थित राहण्याकरता जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज वानखडे यांचे नेतृत्वात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येत रस्त्यावर उपस्थित झालेत. सातबारा कोरा करा ( कर्जमाफी त्वरित करा) तसेच घोषित केल्यानंतरही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झालेली आर्थिक मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशा घोषणा यावेळी करण्यात आल्यात.dcm pawar काँग्रेसचे धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे येथील पंचायत समिती सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य यावेळी उपस्थित होते.
पोलिसांचा बंदोबस्त
अचानकपणे आलेल्या काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांना पांगविण्याकरिता रस्त्यावर उभ्या असलेल्या तळेगाव पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला करण्याचे आटोकाट प्रयत्न केलेत.